असा घडला भारत भाग १९२.
Manage episode 318549639 series 3278214
स्वातंत्र्यप्राप्तीपासून काँग्रेस पक्ष हा सर्वसमावेशक पक्ष राहिला आणि अनेक दलित, आदिवासी बहुजन समाजसमूहांचा संसदीय राजकारणात या पक्षाला पाठिंबा लाभलेला होता. मात्र दलितांचे प्रश्न, त्यांच्या मागण्या, त्यासाठीच्या योजना यांबाबत काँग्रेसची स्वतःची | अशी एक नीती व गती होती आणि त्याबाबत दलित व बहुजनांमध्ये अस्वस्थता होता. १९५६ मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारून नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला, पण अल्पावधीतच त्यांचा मृत्यू झाला. त्यात नंतर रिपब्लिकन पक्षातही दुही माजल्यामुळे दलित बहुजनाच्या मनात सशक्त नेतृत्व लाभत नसल्याबद्दल अस्वस्थता होती. या सर्व पार्श्वभूमीवर, दलित, आदिवासी व बहुजन कर्मचाऱ्यांच्या संघटनांचे नेतृत्व करणाऱ्या कांशीराम यांनी १४ एप्रिल, १९८४ रोजी 'बहुजन समाज पक्ष' या पक्षाची स्थापना केली.
--- This episode is sponsored by · Anchor: The easiest way to make a podcast. https://anchor.fm/app1150 episódios